प्रहार जनशक्ती पक्षाची कार्यकारणी निवड

भुसावळ, प्रतिनिधी । प्रहार जनशक्ती पक्षाची बैठक घेण्यात येऊन यात पक्ष कसा वाढवावा, गोरगरिबांचे जनतेचे आणि अपंगांचे प्रश्न जास्तीत जास्त कसे सोडवता येतील याबाबत आढावा घेण्यात आला.

संस्थापक अध्यक्ष तथा राज्यमंत्री आमदार बच्चुभाऊ कडू यांच्या आदेशाने तसेच संपर्क प्रमुख दत्तू भाऊ बोडके व जिल्हाप्रमुख विजय भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली प्रहार जनशक्ती पक्षाचे युवा शहराध्यक्ष लव वामन घाडगे यांनी आढावा बैठक घेतली. या बैठकीत विविध नियुक्ती करण्यात आल्या. यात युवा शहर उपाध्यक्षपदी जितेन्द्र ज्ञानदेव पाटील, युवा शहर सचिवपदी रजत राजू शिंदे, युवा शहर कार्याध्यक्षपदी महेंद्र तुकाराम बावस्कर तर युवा शहर संघटकपदी जोएब रमजान सय्यद यांची नियुक्ती करण्यात आली . वरील माहिती देतांना प्रहार जनशक्ती पक्षाचे नशिराबाद शहराध्यक्ष मोहन माळी, रोहित पाटील, यांची वसिम सय्यद यांची उपस्थिती होती.

Protected Content