Home आरोग्य प्रसिद्ध अभिनेता किरण कुमारला कोरोनाची लागण !

प्रसिद्ध अभिनेता किरण कुमारला कोरोनाची लागण !


मुंबई (वृत्तसंस्था) प्रसिद्ध अभिनेता किरण कुमार यांना कोरोनाची लागण झाली आहे. लक्षणं नसल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये न ठेवता घरीच ठेवण्यात आले आहे.

 

‘एबीपी न्यूज’ याबाबत वृत्त दिले आहे. ‘एबीपी न्यूज’शी बोलताना स्वत: किरण कुमार यांनी कोरोना पॉझिटिव्ह असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. किरण कुमार यांनी सांगितले की, मुंबईतल्या एका दवाखान्यात काही उपचारासाठी मला जायचे होते. त्यासाठी माझ्या काही टेस्ट घेतल्या. त्यात कोविड-19 टेस्ट देखील घेतली होती. या टेस्टचा रिपोर्ट 14 मे रोजी आला. त्यात मला कोरोना झाल्याचे समोर आले. मला कोरोना व्हायरसची कुठलीही लक्षणं नाहीत. सर्दी, ताप, खोकला तसेच कुठलेही दुखणं नाही. एसिम्टमॅटिक असल्यामुळे हॉस्पिटला भरती होण्याची गरज पडली नाही. सध्या मी सेल्फ आयसोलेशनमध्ये माझ्या दोन मजली घरात आरामात राहत आहे, असेही किरण कुमार यांनी सांगितले.


Protected Content

Play sound