यावल, प्रतिनिधी | येथील जिल्हा मराठा विद्या प्रसारक महाविद्यालयात हिंदी सामान्यज्ञान प्रश्नमंजूषा स्पर्धा परीक्षांचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत राजीक शाह यांनी प्रथम क्रमांक तर रोशन अनिल सोनवणे द्वितीय क्रमांक पटकाविला.
यावल येथील जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात हिंदी सामान्यज्ञान प्रश्नमंजूषा स्पर्धेचे आयोजन प्रा. डॉ. संध्या सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली. यावेळी एकूण १९४ विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला. या स्पर्धेत राजीक शाह (एस. वाय. बी. ए.) यांनी प्रथम क्रमांक तर रोशन अनिल सोनवणे (एस. वाय. बी. कॉम) द्वितीय क्रमांक
तृतीय दिपक रामचंद्र सोनवणे (एस. वाय. बी. ए.) पटकाविला. दरम्यान सदर विद्यार्थ्यांनी या स्पर्धत यश संपादन केल्याबद्दल याबद्दल प्राचार्य डॉ. संध्या सोनवणे व उपप्राचार्य प्रा. एम. डी. खैरनार, प्रा. ए. पी. पाटील, प्रा. संजय पाटील तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले. हि स्पर्धा यशस्वीतेसाठी हिंदी विभाग प्रमुख डॉ. पी. व्ही. पावरा यांनी परिश्रम घेतले.