पाचोरा, प्रतिनिधी । तालुक्यातील नगरदेवळा येथील अग्नावती धरणाची होत असलेली गळती व धरणाची उंची वाढवण्याची होत असलेल्या शेतकरी संघटनेच्या व असंख्य शेतकऱ्यांच्या मागणीवरून आज रोजी प्रधान मंत्री जनकल्याणकारी योजनेचे सचिव प्रशांत पाटील सह नाशिक येथील डॉ. गोपाळ शिसोदे, उखाजी चौधरी, नंदकुमार उदावंत यांनी भेट देऊन पाहणी केली.
या भेटीप्रसंगी शेतकरी संघटना पाचोरा तालुका अध्यक्ष नामदेव नाना महाजन यांनी सर्व मान्यवरांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला व शेतकऱ्यांच्या मागणीचे निवेदन दिले. नगरदेवळा येथील सरपंच प्रतीक्षा काटकर व उप सरपंच विलास भामरे यांच्यासह असंख्य शेतकऱ्यांसोबत चर्चा करतांना सांगितले की, आपल्या अग्नावती धरणाच्या दुरुस्तीसह ग्राम विकासाच्या इतर सर्व मागण्या पूर्ण करण्याकरिता मी व माझे सहकारी योग्य ती मदत करून जल संपदा विभाग तथा ग्राम विकास मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून सर्व अडचणी दूर करू असे आश्वासन प्रशांत पाटील यांनी यावेळी उपस्थितांना दिले.