प्रलंबित हद्दपार प्रकरणावर त्वरित कारवाई करा : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (व्हिडिओ)

जळगाव, प्रतिनिधी ।  सराईत गुन्हेगार टोळी प्रमुखाचे व टोळी सदस्य यांचे हद्दपारीचे प्रकरण जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे प्रलंबित आहे. या टोळीच्या हद्दपार प्रकरणावर त्वरित कारवाई करावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून जिल्हाधिकारी यांना निवेदन देवून केली आहे. 

 

निवेदनाचा आशय असा की,  भुसावळ शहरात सराईत गुन्हेगार  प्रकाश गिरिधर निकम याची टोळी सक्रीय आहे.  याचे हद्दीपारीचे प्रस्ताव जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे प्रलंबित आहे. या टोळीवर कारवाई व्हावी यासाठी जनआधार विकास पार्टीच्या नगरसेविका पूजा राजू सूर्यवंशी यांनी ३१ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केलेली आहे. मात्र, अद्यापही कोणतीही हद्दपारीची कारवाई करण्यात आलेली नाही. जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी जिल्ह्यातील लहान-मोठे गुन्हेगार यांच्यावर हद्दपारीची कारवाई केली आहे. मात्र, त्यांनी प्रकाश गिरिधर निकम व त्याच्या टोळीवर कारवाई केलेली नाही. तरी निकम व त्याच्या टोळीवर हद्दपारीची कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आलेली आहे. हद्दपारीची कारवाई न झाल्यास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. निवेदनावर यावल तालुका अध्यक्ष अशोक बोरेकर, ईश्वर इंगळे, अशोक तायडे, रावेर तालुका अध्यक्ष विकी तायडे, बोदवड तालुका अध्यक्ष संजय तायडे, कमलाकर गाढे, किरण ढिवरे आदींची स्वाक्षरी आहे.

 

 

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/635219344110635

 

Protected Content