जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महापालिकेच्या प्रभाग समितीच्या सभापती निवड प्रक्रिया पिठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या अध्यक्षतेखाली राबविण्यात आली. यावेळी चार प्रभाग समिती सभापतींची निवड घोषीत करण्यात आली.
यावेळी शिवसेनेतर्फे एकही प्रभागाचे सभापतिपद न घेण्याची भूमिका जाहीर करण्यात आली, त्यामुळे चारही पदे विरोधकांना देण्यात आली, त्यात एक सभापतिपद भाजपला, तर एक एमआयएम व दोन बंडखोर गटाला देण्यात आले आहे. त्यामुळे महापालिकेच्या चारही प्रभाग समितीच्या सभापतिपदाची निवड बिनविरोध झाल्याचे चित्र या आगोदर स्पष्ट झाले होते. बुधवार २० एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता महापालिकेच्या दुसऱ्या मजल्यावर जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या उपस्थितीत अधिकृत घोषणा करण्यात आली.
निवड झालेले समिती सभापती
यात प्रभाग समिती १ मधून खान रूखसाना बी बबलूखान, प्रभाग समिती २ मधून भाजपचे मुकुंदा सोनवणे, प्रभाग समिती ३ मधून सुन्नाबी राजू देशमुख आणि प्रभाग समिती ४ मधून पार्वताबाई भिल यांची निवड घोषील करण्यात आली.
प्रभाग समितीत समाविष्ट असलेले प्रभाग क्रमांक
प्रभाग समिती १ मध्ये (१, २, ५, ७, ८) – सभापती – रूखसाना बी बबलूखान
प्रभाग समिती २ मध्ये (३, ४, १५, १६, १७) – सभापती – मुकुंद भागवत सोनवणे
प्रभाग समिती ३ मध्ये (६, १३, १४, १८, १९) – सभापती – सुन्नाबी राजू देशमुख
प्रभाग समिती ४ मध्ये (९, १०, ११, १२ ) – सभापती पार्वताबाई दामू भिल
याप्रसंगी पीठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिजित राऊत, महापालिका आयुक्त सतिश कुळकर्णी यांच्यासह आदी उपस्थित होते.