जळगाव, प्रतिनिधी । कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी ७. जुलैपासून लॉकडाऊन जाहीर केला आहे. या कालावधीत शहरात महापालिकेतर्फे विविध सामाजिक संस्थांच्या मदतीने आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. यानुसार प्रभाग क्र.२ मध्ये आरोग्य तपासणी करण्यात येत आहे.
प्रभाग क्र. २ मध्ये आतापर्यंत नगरसेवक नवनाथ दारकुंडे. धर्मरथ फाउंडेशनचे अध्यक्ष विनायक पाटील. तसेच राष्ट्रवादी युवामंचचे अध्यक्ष मजरभाई पठाण व या मधील सर्व संस्थेचे कार्यकर्ते व महापालिकेच्या अधिकारीवर्ग व शिक्षक वर्ग अंगणवाडी वर्ग यांच्या संयुक्त विद्यमानाने रोज २०० घरांची घरोघरी जाऊन तपासणी करून नागरिकांना यासंदर्भात माहिती देण्यात येत आहे. तरी त्यासोबत आर्सेनिक अल्बम ३० या होमिओपॅथिक गोळ्यांचे घरोघरी वाटप करण्यात येत आहे. तरी नागरिकांनी सर्वक्षण करणाऱ्या लोकांना सहकार्य करावे असे नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांनी केले आहे.