भुसावळ (प्रतिनिधी) येथील सामाजिक कार्यकर्ते शिशिर दिनकर जावळे यांची प्रधानमंत्री जनकल्याण प्रचार व प्रसार समितीच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी नुकतीच निवड जाहीर करण्यात आली आहे. समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष पुशेष आर्य यांच्या आदेशावरून महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष भगवान बागुल यांनी ही नियुक्ती केली आहे.
सदर समितीच्या मार्गदर्शक मंडळांमध्ये आयुष मंत्री भारत सरकार यशको नायक, भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्याम जाजू, निवृत्तलेफ्टनंट कर्नल तथा राज्यसभेचे खासदार श्री डॉक्टर डी, पी.वत्स. हे असून सदर योजनेच्या समितीच्या ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून खासदार हेमामालिनी आहेत. एक या समितीचे संपूर्ण भारतात विविध राज्यांमध्ये संघटन आहे. प्रधानमंत्री जनकल्याण प्रचार व प्रसार समिती केंद्र सरकारच्या, माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विविध कल्याणकारी योजना विद्यार्थी युवक व महिला वृद्ध, शेतकरी., बेरोजगार, विधवा, अपंग, कामगार, अनाथ, उद्योजक यांच्यापर्यंत पोहोचविण्याचे प्रचार व प्रसाराचे कार्य सदर समिती करते. जनतेसाठी च्या या विविध कल्याणकारी योजनां ची अंमलबजावणी होते किंवा नाही याचीसुद्धा सदर समिती पडताळणी करून त्याचा सातत्याने आढावा घेत असते. व पाठपुरावा करून संबंधित योजनांचा लाभ जनतेला मिळवून देण्याचे कार्य करीत आहे. जनतेच्या विविध समस्या सोडविण्यासाठी शासन व प्रशासना पर्यंत पोहोचविण्यासाठी दुवा म्हणून कार्य करीत आहे. लवकर या प्रधानमंत्री जनकल्याण प्रचार व प्रसार समितीचा विस्तार जळगाव जिल्ह्यातील संपूर्ण तालुक्यांमध्ये करणार असल्याचे व प्रधानमंत्री जन कल्याणकारी योजना तळागाळातील सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवून सदर योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी शासन व प्रशासनात भाग पाडणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते शिशिर जावळे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे. तसेच अधिक माहिती व संपर्क साठी 9325147700 ह्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचे आवाहन देखील त्यांनी केले आहे.