जळगाव, प्रतिनिधी । आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नानासाहेब पटोले यांचा वाढदिवस साध्या पद्धतीने साजरा करून जळगाव ग्रामीण तालुका काँग्रेसच्यावतीने गोर गरिबांना धान्य वाटप करण्यात आले.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नानासाहेब पटोले यांच्या वाढदिवसानिमित्त कुठलाही बडेजाव न करता बँनर, वायफळ खर्च न करता साध्या पध्दतीने जळगांव ग्रामीण तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मनोज डिंगबर चौधरी यांच्या नेतृत्वाखाली ग्रामीण भागातील गरजु हातमजुर महिला कामगार तसेच लाँकडाऊन काळात बंद असलेल्या गरजु सलुन व्यवसायिंकांना मदतीचा हात म्हणुन गहु व तांदुळाचे वाटप करण्यात आले आहे. नानासाहेब पटोले हे शेतकऱ्यांचे कैवारी असुन त्यांचा जन्म कष्टकरी शेतकरी कुंटुंबातच झाले आहे. असे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी तालुका अध्यक्ष – मनोज चौधरी, प्रमोद घुगे, सचिन माळी, सागर कुंटुबळे, पुरुषोत्तम घुगे आदींनी परिश्रम घेऊन हा कार्यक्रम यशस्वी करण्यात आला.