Home क्रीडा प्रदूषणमुक्त भुसावळसाठी सायकलस्वारी !

प्रदूषणमुक्त भुसावळसाठी सायकलस्वारी !

0
82

भुसावळ प्रतिनिधी । येथील रोटरी रेल सिटी भुसावळतर्फे रविवारी मस्वच्छ भुसावळ, प्रदूषणमुक्त भुसावळफसाठी सायक्लोथॉनचे आयोजन झाले.

सध्या वाहनांच्या अतिवापरामुळे प्रदूषणाचे प्रमाण वाढले आहे. या पार्श्‍वभूमिवर, प्रदूषणमुक्त भुसावळसाठी सायक्लोथॉनचे आयोजन करण्यात आले. नगराध्यक्ष रमण भोळे व माजी नगराध्यक्ष युवराज लोणारी यांनी सायक्लोथॉनला हिरवी झेंडी दाखवली. महात्मा गांधी पुतळा, लोखंडी बोगदा, जामनेररोड हॉटेल हेवन व त्याच मार्गाने परत डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदानावर सायक्लोथॉनचा समारोप झाला. या उपक्रमात भुसावळकर मोठ्या संख्येने सहभागी झाले. यशस्वीतेसाठी प्रोजेक्ट चेअरमन विशाल ठोके, अध्यक्ष सोनू मांडे, सेक्रेटरी डॉ. मकरंद चांदवडकर यांनी सहकार्य केले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound