जळगाव, प्रतिनिधी । येथील विवेकानंद प्रतिष्ठान इंग्लिश मिडीयम स्कूल येथे कार्यरत सहाय्यक शिक्षक प्रदीप मधुकर वाघ यांना कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे ‛शिक्षणशास्त्र’ या विषयात पीएचडी प्रदान करण्यात आली आहे.
डॉ. प्रदीप वाघ यांनी ‛इंग्रजी आणि मराठी माध्यमांच्या प्राथमिक शाळेतील शिक्षकांचा सर्वसमावेशक शिक्षणाकडे बघण्याच्या मनोवृत्तीचा अभ्यास’ या विषयावर प्रबंध सादर केला आहे. त्यांना या संशोधनासाठी एस.जी. व्ही. पी.सी. शिक्षण शास्त्र महाविद्यालय खिरोदा येथील डॉ. नाना नारायण लांडगे यांचे मार्गदर्शन लाभले. प्रदीप वाघ यांनी आपल्या संपूर्ण यशाचे श्रेय वडील मधुकर लोटन वाघ(सेवानिवृत्त सहाय्यक जळगाव), आई विमल मधुकर वाघ तसेच पत्नी योगिता वाघ यांना दिले असून या यशाबद्दल विवेकानंद प्रतिष्ठान इंग्लिश मिडीयम स्कूलचे प्राचार्य ज्ञानेश्वर पाटील यांच्यासह सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनीही त्यांचे कौतुक केले आहे.तसेच व्यवस्थापन मंडळाने देखील त्यांचे कौतुक केले व भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.