प्रत्येक महिलेच्या संरक्षणातूनच तिचा सर्वांगीण विकास शक्य: डॉ.विजेता सिंग

 

 

जळगाव, प्रतिनिधी   । ज्या ठिकाणी आज महिला कर्मचारी काम करीत असतील अशा सर्व ठिकाणी महिलांना संरक्षणाची गरज आहे. महिलांच्या संरक्षणातूनच त्या सुखरूप राहू शकतात आणि त्यांचा सर्वांगीण विकास देखील शक्य होईल असे प्रतिपादन प्रा.डॉ. विजेता सिंग यांनी केले.

मू.जे. महाविद्यालयात अंतर्गत तक्रार समिती व युवती सभा यांचे संयुक्त विद्यमाने महिला संरक्षण कायदे व अंतर्गत तक्रार समिती या विषयावर डॉ. विजेता सिंग, (एस.एस. मणियार विधी महाविद्यालय,जळगाव) यांचे ऑनलाइन मार्गदर्शक व्याख्यान आयोजित करण्यात आलेले होते या प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी युवती सभेच्या प्रमुख हेमलता पाटील, तक्रार समितीच्या प्रमुख उज्वला भिरूड यांची व्याख्यानाला उपस्थिती होती. पुढे बोलतांना डॉ.सिंग यांनी सांगितले की, महिलांच्या सुरक्षेसाठी लैंगिक छळ कायदा कार्य प्रतिबंध, प्रोव्हीबिशन अँड रेड्रेसल ॲक्ट 2013 अस्तित्वात आला आहे.  भारतात असे कायदे का आले त्याचा उद्देश काय याबाबत त्यांनी सखोल मार्गदर्शन केले. तसेच विविध उदाहरण देखील यावेळी त्यांनी उपस्थितांना दिले. महिलांच्या संरक्षणासाठी राज्यघटनेत आधी पासूनच अशा तरतूदचा समावेश करण्यात आला आहे. कायद्यासमोर सर्व एक आहे, सर्वांसाठी कायदा समान आहे. काही महिला आयपीएस  अधिकाऱ्यांची उदाहरणे देत त्यांनी कायद्याविषयी माहिती दिली. तसेच विद्यापिठ अनुदान आयोगने देखील महिलांच्या सुरक्षे सबंशी नियमावली तयार केली आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी शाळा, महाविद्यालये येथे लैंगिक छळ तक्रार समिती काम करीत आहे.यामुळे महिलांना संरक्षण मिळते  तसेच आयसीसी समितीच्या प्रोसिजर, प्रक्रिया, कारवाईबाबत देखील त्यांनी माहिती दिली. ऑनलाईन झालेल्या या व्याख्यानात त्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना देखील उत्तरे देत शंकांचे निरासन केले.

Protected Content