जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा असतांना यातील अनेक स्वातंत्र्य सैनिक आपल्याला माहित नाही. त्या स्वातंत्र्यसैनिकांचा शोध घेऊन प्रा. श्रीकृष्ण सोमवंशी आणि त्यांच्या पत्नी प्रा. डॉ. राधिका सोमवंशी यांनी ‘कथा क्षत्रिय शौर्याच्या’ या पुस्तकातून त्यांचा गैरव केला आहे. याचा आदर्श डोळ्यापुढे ठेऊन प्रत्येकाने आपल्या समाजातील स्वातंत्र्यसैनिकांचा शोध घेऊन त्यांना सन्मानित केले पाहिजे, असे प्रतिपादन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. के. बी. पाटील यांनी केले.
लेखक प्रा. श्रीकृष्ण विष्णू सोमवंशी यांनी लिहिलेल्या ‘कथा क्षत्रिय शौर्याच्या’ या पुस्तकाचे प्रकाशन रविवार, २४ रोजी सकाळी १२ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात उत्साहात पार पडले. त्यावेळी अध्यक्षस्थानावरून डॉ. के. बी. पाटील बोलत होते.
याप्रसंगी मंचावर ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक बाबुराव पिंपळे (बीड), माजी शिक्षणाधिकारी नीळकंठ गायकवाड, सोमवंशी आर्य क्षत्रिय समाज प्रादेशिक अध्यक्ष श्यामराव चव्हाण, अध्यक्ष श्यामसुंदर छत्रबंद, अ. भा. सोमवंशी आर्य क्षत्रिय समाज अध्यक्ष प्रमोद बागलाणे, अखिल भारतीय गाडीलोहार खान्देश विभाग अध्यक्ष रमेश भागवत, डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी, प्रा. श्रीकृष्ण सोमवंशी, प्रा. डॉ. राधिका सोमवंशी आदी मान्यवर उपस्थित होते.
देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान केलेल्या परंतु दुर्लक्षित राहिलेल्या सोमवंशी आर्य क्षत्रिय समाजातील स्वातंत्र्य सैनिकांची प्रेरणादायी गाथा या पुस्तकात मांडण्यात आली आहे. पूर्ण भारतातले आर्य क्षत्रिय समाजातील लुप्त होण्याच्या मार्गावर असलेले ३१ स्वातंत्र्य सैनिकांची माहिती या पुस्तकात आहे. यातील आज बाबुराव पिंपळे आणि उद्धवराव पिंपळे (दोन्ही रा. टाकळगाव, ता. गेवराई, जि.बीड) हयातीत आहे. पुस्तकात समाजातील ज्या २० कलाकारांनी रेखाचित्र रेखाटले आहेत. यामध्ये कला महर्षी असणारे कलाकारांचा समावेश आहे.
प्रास्ताविक प्रा. श्रीकृष्ण सोमवंशी आणि पत्नी प्रा. डॉ. राधिका सोमवंशी यांनी केले. अ.भा.समाज अध्यक्ष प्रमोद बागलाणे म्हणाले की, समाजाविषयी आदर आणखी वाढण्यासाठी अधिकाधिक स्वातंत्र्य सैनिकांचा शोध घेतला गेला पाहिजे, त्यामुळे समाजाची अखंडता राहील, असेही ते म्हणाले.
यांचा झाला सत्कार
यावेळी उपस्थित ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक बाबुराव पिंपळे यांचा सत्कार श्रीफळ, शाल आणि पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांनी केला. त्याचप्रमाणे स्वातंत्र्य सैनिक धोंडिबा तुळशीराम चव्हाण यांचे पुत्र श्रावण चव्हाण (औरंगाबाद), स्वातंत्र्य सैनिक चंद्रकांत शंकरराव चव्हाण (पुणे) यांचे पुत्र किरण चव्हाण आणि स्वातंत्र्य सैनिक विष्णू चिंधू सोमवंशी (नंदुरबार) यांचे नातू महेंद्र वसंत सोमवंशी यांचा प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार झाला. तसेच चित्रकार प्रा. गोपाळ डोंगे, सोलापूर, शुभम मानेकर, पुणे, निखील बोरसे, जळगाव, आदर्श संघपाल, नंदुरबार, तुषार वानखेडे, जळगाव,रोहित सोमवंशी, शहादा यांचासुद्धा मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यांची होती उपस्थिती
यावेळी सुरेश भागवत (धरणगाव), रवींद्र भागवत, डॉ. व्ही. बी, शहा, डॉ. एस. वाय. पाटील, यजुर्वेंद्र महाजन, एन. डी. चौधरी, भारतीताई इंगळे, सुजाता देशपांडे, गोपाळ पाटील, जिल्हा सांकेतिक अधिकारी राजेंद्र बोरसे, नितीन पाटोळे, सुभाष जगताप (शेंदुर्णी), डॉ. अरुण पाटील, जे. टी. अत्तरदे, नंदुरबार येथील रामेश्वर संकपाळ, बापू इंगळे, गजानन इंगळे, राजेंद्र बोरसे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. डॉ. डी. यु. राठोड आणि प्रा. उमेश इंगळे यांनी केले. आभार प्रा. डॉ. राधिका सोमवंशी यांनी मानले.
भाग १
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/611585466961293
भाग २
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/1448129205650700
भाग 3
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/462817508615716