मुंबई प्रतिनिधी । शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी आपल्या विरूध्द १०० कोटींचा बदनामीचा खटला दाखल करून दाखवावाच असे खुले आव्हान भाजप नेते तथा माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केले आहे.
शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या विहंग ग्रुप ऑफ बिल्डर्सने बांधलेल्या दोन इमारतींमध्ये चार मजल्यांचे अनधिकृत बांधकाम केल्याचा आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे. तर, सोमय्या यांनी आठ वर्षे जुने प्रकरण बाहेर काढून जाणीवपूर्वक बदनामीचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे त्यांच्यावर १०० कोटी रुपयांच्या अब्रूनुकसानीचा दावा करणार असल्याचे आमदार प्रताप सरनाईक म्हणाले आहेत. यावर आता भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी प्रताप सरनाईक यांनी माझ्या विरुद्ध मानहानीचा दावा दाखल करून दाखवावा,असे खुले आव्हान दिले आहे.
शिवसेना प्रताप सरनाईकनी माझ्याविरुद्ध १०० कोटी रुपयांचा मानहानीचा दावा दाखल करावाच. त्यांचा भ्रष्टाचार, घोटाळे उघड करण्याचा आमचा लढा सुरूच राहील. असं सोमय्या यांनी ट्विट करून उघडपणे आव्हान दिलं आहे.