श्रीनगर वृत्तसंस्था । प्रजासत्ताक दिनी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ल्याचा कट रचणाऱ्या जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या 5 दहशतवाद्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून शस्त्रसाठा जप्त करण्यात आले आहे. पाचही शत्रू प्रजासत्ताक दिनी काश्मीरमध्ये मोठा घातपात करण्याचा तयारी होते. मात्र, पोलिसांनी त्यांचा कट उधळून लावला.
जम्मू-काश्मीर पोलिसांनी सांगितलेल्या माहितीनुसार, एजाज अहमद, उमर हमीद शेख, इम्तियाज अहमद, साहिल फारुख, नसीर अहमद मीर अशी दहशतवाद्यांची नावे आहेत. हे पाचही जण प्रजासत्ताक दिनी मोठा घातपात करण्याच्या तयारीत होते. मात्र, सुरक्षादलांच्या सतर्कतेमुळे दहशतवादी कारवायांना चाप बसला आहे. हजरतबल येथे झालेल्या बॉम्बस्फोटातील हे आरोपी असून श्रीनगर पोलिसांनी जैशच्या दहशतवाद्यांना पकडल्याने मोठे यश मिळाले आहे. काश्मीरमधून 370 हटवल्यानंतर अनेक दहशतवादी काश्मीरमध्ये घातपात करण्यासाठी हालचाली करत आहेत.