Home क्राईम पोलीस स्थानकातच आत्महत्येचा प्रयत्न

पोलीस स्थानकातच आत्महत्येचा प्रयत्न

0
42

यावल प्रतिनिधी । पोलिस स्टेशनमध्ये तक्रार देण्यास आलेल्या व्यक्तीने विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना आज सकाळी यावल येथे घडली.

याबाबतचा वृत्तांत असा की, येथील मो.फारूक मो.अब्दुल समद यांचा शहरातील रहिवासी सय्यद अशपाक सय्यद निसार यांच्याशी आर्थिक कारणावरून वाद झाला. यामुळे फारूक यांनी यावल पोलिस स्टेशन गाठले. पोलिस स्टेशनमध्ये ठाणे अंमलदार संजीव चौधरी हे त्यांची तक्रार लिहून असतांनाच त्यांनी त्यांच्या जवळील असलेली एका विषारी द्रव्याची बाटली काढून विषारी द्रव्य प्राशन करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी फारुक यांना तातडीने ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार दाखल करण्यात आले. डॉ. परवीन तडवी, सरला परदेशी, डॉ. उमेश कवडीवाले यांनी प्रथमोपचार केले. फारुक यांची प्रकृती खालवल्याने त्यांना जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार्थ हलवण्यात आले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound