अमळनेर प्रतिनिधी | पोलीस वा खाकी कुण्या धर्माची मक्तेदारी नाही, गुन्हा गुन्हाच असतो असे परखड मत अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांनी व्यक्त केले. ते सोशल मिडीयावर व्हायरल होणाऱ्या पोस्टच्या पार्श्वभूमीवर आयोजित शांतता बैठकीत बोलत होते.
याप्रसंगी आमदार अनिल पाटील, माजी आमदार स्मिता वाघ, माजी आमदार साहेबराव पाटील, डीवायएसपी राकेश जाधव,पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, भैरवी वाघ पलांडे, नगरसेवक प्रताप शिंपी,बाळा संदानशिव,कृ.बा.समिती चेअरमन तिलोत्तम पाटील आदी उपस्थित होते.
बैठकीला एका प्रकारे जत्रेचे स्वरूप आले होते.यावेळी शहरातील कायदा व सुव्यवस्था कशी अबाधित राहील याविषयी चिंता विविध मान्यवरांनकडून करण्यात आली. यावेळी माजी आमदार स्मिता वाघ यांनी जे काही सोशल मीडियावर आक्षेपार्य पोस्ट वायरल होत आहे त्यावर पोलिसांनी कडक कार्यवाही करावी व बंद पडलेले निर्भया पथक पुन्हा कार्यरत करावी अशा सूचना केल्या. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक चोपडे यांनी गुन्हेगारांची गयकेली जाणार नाही तर काल झालेली मुलगी पळून घेऊन गेल्याची निदनिय घटनाची मिसिंग दाखल असून व आज संध्याकाळी झालेली दगडफेक याविषयी आम्ही गुन्हा दाखल करू असे आश्वासन दिले. तर शहरात शांतता नांदावी हे प्रत्येकाने ही खबरदारी घ्यावी. पोलिसांनी नेमलेल्या तीन पथकांना सहकार्य करावे. तर ठामपणे पोलीस याचा तपास लावतील याचा विश्वास ठेवावा असे भावनिक आवाहन अप्पर पोलीस अधीक्षक चोपडेकर यांनी केले.
आमदार अनिल पाटील यांनी जे सोशल मीडियावर अफवा पसरत आहेत त्या थाबल्या पाहिजेत तर प्रत्येकाने बंधूभाव राखावा असे उपस्थितांना आवाहन केले तर या मुद्यावर माजी आमदार साहेबराव पाटील यांची घिसळघाई प्रतिक्रिया पाहाता काहीनी नाराजी व्यक्त केली.