जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील पहूर या गावात पोलिसाला मारहाण करून फरार झालेल्या दोघ आरोपींना परभणी येथे पोलिसांनी शुक्रवारी २० जानेवारी रेाजी अटक केली आहे. संशयित आरोपींना शुक्रवारी २० जानेवारी रोजी दुपारी न्यायालयात हजर केले असता त्यांना तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जामनेर तालुक्यातील पहूर येथील पोलीस कर्मचारी हे १४ जानेवारी रोजी रात्री शहरात पेट्रोलींग करत असतांना रस्त्यामध्ये आरोपीची दुचाकी वाहन उभे होते. यावेळी पोलिसांनी त्यांना रस्त्याच्या बाजूला काढण्यास सांगितले असता आरोपी फिरोज सुपडू तडवी, ख्वाजा सांडू तडवी या दोघांनी सहाय्यक फौजदार अनिल सुरवाडे व पोलीस कॉन्स्टेबल रवी मोरे यांना पट्टा व दांड्याच्या साह्याने बेदम मारहाण केली होती. या घटनेनंतर दोन्ही संशयित आरोपी हे फरार झाले होते. या घटनेत पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले होते. याबाबत पहूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपींना पकडण्यासाठी पहूर पोलीस पथक पोलीस उपनिरीक्षक अमोल गर्जे, पोलीस कॉन्स्टेबल विजय सानप, पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर ठाकरे, पोलीस कॉन्स्टेबल ईश्वर कोकणे यांच्यासह परभणी जिल्ह्यातील शिरसाळा येथील पोलीस पथकांच्या मदतीने सापळा रचून आरोपी शेख फिरोज सुपडू तडवी व ख्वाजा सांडू तडवी यांना पहूर पोलीसांनी ताब्यात घेतले. शुक्रवारी जामनेर न्यायालयात हजर केले असता दोघांना तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.