पोलीस भरतीत एसइबीसीसाठी खुल्या प्रवर्गाच्या जी आर रद्द

 

मुंबई : वृत्तसंस्था । राज्यातील पोलीस भरतीसंदर्भात ४ जानेवारीला गृहविभागाने काढलेला जीआर रद्द करण्यात आलाय, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिलीय. या जीआरनुसार एसईबीसीच्या विद्यार्थ्यांना पोलीस भरतीत खुल्या प्रवर्गातून भरती व्हावे लागेल, असा उल्लेख होता.

अखेर तो जीआर रद्द करण्यात आल्यानं मराठा समाजातील विद्यार्थ्यांना दिलासा मिळालाय. एसईबीसीच्या विद्यार्थ्यांना आर्थिक दुर्बल घटकाचा लाभ मिळावा म्हणून गृहविभाग आता शुद्धीपत्रक काढणार आहे.

या भरतीला एसईबीसीचं आरक्षण गृहीत धरण्यात आलेलं नव्हतं. त्यामुळे मराठा संघटनांनी त्याला विरोध दर्शवला होता. त्यासाठी मराठा संघटना आक्रमकतेची भाषा करत होते. त्यानंतर गृह विभागानं भरतीसंदर्भातील तो जीआर रद्द करण्याचा निर्णय घेतलाय. पण ह्या निर्णयामुळे पोलीस भरतीच्या तयारीला लागलेल्या तरुणांच्या पदरी अवघ्या काही दिवसातच निराशा आलीय.

राज्यात पोलीस भरतीकरिता एसईबीसीच्या ज्या उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले आहेत, त्यांना मोठा दिलासा देण्यात येत असून गृह विभागाने ४ जानेवारीरोजी निर्गमित केलेला शासन निर्णय रद्द करण्यात येत आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. पोलीस शिपाई भरतीकरिता ज्या एसईबीसी उमेदवारांनी अर्ज केले होते, त्यांना शासनाच्या सा.प्र.वि. कडील 23 डिसेंबर 2020 च्या शासन निर्णयाचा लाभ देण्याच्या दृष्टिकोनातून सुधारित शासन निर्णय गृह विभागाकडून लवकरच निर्गमित करण्यात येणार आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

Protected Content