यावल, प्रतिनिधी । यावल तालुक्यातील सावखेडा सिम येथील पोलीस पाटील यांच्यावरील झालेल्या भ्याड हल्याचा यावल तालुका पोलीस पाटील संघटनाच्या वतीने जाहीर निषेध करून त्या हल्लेखोरांना कडक शासन व्हावे या मागणीचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले.
यावल तालुका पोलीस पाटील संघटनेच्या वतीने आज दि. ५ जुलै रोजी यावलचे तहसीलदार महेश पवार यांना निवेदन देण्यात आले. निवेदनाचा आशय असा की, सावखेडा सिम येथे कार्यरत असलेले पोलीस पाटील पंकज बडगुजर यांच्यावर गावातील काही मंडळीनी घरात घुसुन मारहाण केल्याची घटना घडली आहे. या घटनेचा यावल पोलीस पाटील तालुका संघटनेच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला. पोलीस पाटील यांच्या हल्ला करणाऱ्यांना कडक शासन करून , त्यांच्यावर दाखल केलेला खोटा गुन्हा दाखल झाला असुन या गुन्ह्याची शहानिशा पोलीस प्रशासनाकडुन व्हावी अशी मागणी यावल पोलीस पाटील संघटनाच्या वतीने करण्यात आली. निवेदनावर पोलीस पाटील गणेश सिताराम पाटील , प्रफुल्ला गोडुलाल चौधरी, ज्ञानेश्वर नामदेव महाजन, संजय रज्जुसिंग राजपुत, अशोक रघुनाथ पाटील , पवन हेमंत चौधरी , रेखा दिनकर सोनवणे , सरीता रमजान तडवी , राजरत्न राहुल आढाळे , मेहमुद फत्तु तडवी , उमेश प्रकाश पाटील , समाधान रविन्द्र अडकमोल, नसीमा निसार तडवी , माधुरी संजय राजपुत , मुक्ता संजयगिर गोसावी आणि राकेश वासुदेव साठे यांच्या स्वाक्षरी आहेत.