Home राजकीय पोलीसांमुळेच आपली मुंबई सुरक्षित : सुप्रिया सुळे

पोलीसांमुळेच आपली मुंबई सुरक्षित : सुप्रिया सुळे


मुंबई (वृत्तसंस्था) आपली मुंबई सुरक्षित आहे, ही मुंबई पोलीस तुम्ही बजावत असलेल्या कर्तव्यामुळेच… तुमच्या या मानवी मूल्ये जपणाऱ्या सेवाभावास सॅल्यूट, असे ट्विट राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे.

 

अवघ्या दोन दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी मुंबई पोलिसांवर आक्षेप घेतला होता. फिल्म्स स्टार सुशांत सिंगच्या आत्महत्या प्रकरणी या शहरात मला सुरक्षित वाटत नाही, या शहरात माणुसकी राहिलेली नाही, अशी भावना व्यक्त केली होती. त्यानंतर आज सुप्रिया सुळे यांनी मुंबई पोलिसांचे विशेष कौतुक केले आहे. त्यामुळे सुप्रिया सुळे यांनी ट्विट मधून अप्रत्यक्षरीत्या अमृता फडणवीस यांना उत्तर दिल्याचे बोलले जात आहे.


Protected Content

Play sound