जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी – उत्कृष्ठ कामगिरी केलेल्या पोलीस कर्मचाऱ्याना राष्ट्रपती पदक पुरस्काराचे वितरण संसर्ग प्रादुर्भावामुळे काळात लांबणीवर पडले होते, या संदर्भात माहिती अधिकार अंतर्गत माहिती अधिकार कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांनी माहिती मागितली होती. या प्रयत्नांना यश आले आहे.
राज्यातील पोलीस प्रशासनात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याना राष्ट्रपती पुरस्काराचे वितरण केले जाते. हे पदक सेवा काळात मिळाल्यास त्या कर्मचाऱ्यांचा सन्मान महत्वाची बाब आहे. परंतु संसर्ग प्रादुर्भावामुळे बरेचसे पोलीस कर्मचारी राष्टपती पदक पुरस्कारापासून वंचित होते, हि खंत एका अधिकाऱ्याने माहिती अधिकार कार्यकर्ते यांच्याकडे व्यक्त केली. त्यानुसार २०१६ ते २०२१ दरम्यान ५ वर्षात किती पोलिस कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पदक पुरस्काराचे वितरण करण्यात आले, याची माहिती अधिकार कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांनी राजपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या राजभवन कार्यालयाकडे माहिती अधिकार अंतर्गत १३ सप्टेंबर २०२१ रोजी पत्रव्यवहार करीत मागितली. यात पोलीस विभागातील राष्ट्रपती पदक पुरस्कारासाठी पात्र सन्मानार्थी, त्यानुसार वितरण करण्यात आलेले पुरस्कार, तसेच २५ मार्च २०२० ते १३ सप्टेंबर २०२१ या लॉकडाऊन काळात राजभवन येथे पुरस्कार वितरण झालेले कार्यक्रम आदी माहितीचा उल्लेख होता. या माहिती अधिकार अर्जावर काहीही उत्तर न मिळाल्याने १८ ऑक्टोबर २०२१ रोजी पहिला अपील अर्ज दाखल करण्यात आला.
माहिती अधिकार अर्जाची दखल राजभवन येथून घेण्यात येवून लगेचच काही महिन्याच्या कालावधीत पोलीस प्रशासनात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याना राष्ट्रपती पुरस्काराचे वितरण कार्यवाहीला वेग देण्यात आला आहे . त्यानुसार माहिती अधिकार कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांच्या प्रयत्नास यश आल्याचे दिसून आले आहे.