रावेर प्रतिनिधी । विधानसभा निवडणुकीसाठी तालुक्यातील चोरवड येथे स्थिर तपासणी पथकाच्या सरकारी कामात अडथळा आणुन पोलीस कर्मचार्यांला मारहाण करणार्या तिघांना रावेर पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत वृत्त असे की, विधानसभा निवडणूकीसाठी आक्टोबर महिन्यात तालुक्यातील चोरवड येथे स्थिर तपासणी पथक तैनात करण्यात आले होते. यावेळी राहुल निंभोरे वय २४,अनिल नारायण निंभोरे वय २७ ( दोन्ही रा.चोरवड) आणि गणेश खंडू भारुडे (रा. कुर्हे पानाचे ता .भुसावळ) यांनी या पथकाच्या सरकारी कामात अडथळा निर्माण करून पथकातील पोलीस कर्मचारी नितीन पाटील यांना मारहाण केली होती. तेव्हा पासून हे आरोपी फरार होते. याबाबत रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी गुप्त माहिती वरुन सापळा रचून तिघांना अटक केली. त्यांना रावेर न्यायालयात हजर केले असता दि.१६ मार्च पर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शितलकुमार नाईक, पो.काँ निलेश चौधरी, भरत सोपे व सहकारी करित आहेत.