मुक्ताईनगर प्रतिनिधी । खामखेडा रस्त्यावर एका शेतात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांच्या गुन्हा अन्वेषण शाखेने टाकलेल्या छाप्यात तब्बल पाच लाख ६१ हजार रुपये रोख रक्कम असा मुद्देमाल आठ जणांना अटक करण्यात आली. रविवारी सायंकाळी पाच ते सहाच्या वाजेच्या दरम्यान ही कारवाई करण्यात आली.
खामखेडा रस्त्यावरील पूर्णा नदीच्या पात्राजवळील असलेल्या एका शेतात जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना मिळाली. त्यानुसार सहाय्यक पोलिस निरीक्षक स्वप्नील नाईक यांच्यासह पथकातील विकास वाघ संजय हिवरकर, दीपक चौधरी, राजेश मेढे, रवी नरवाडे, रमेश चौधरी, प्रीतम पाटील, नितीन बाविस्कर, प्रमोद लाडवंजारी यांच्या पथकाने सायंकाळी जुगार अड्ड्यावर छापा टाकला. याप्रसंगी अजय अरुण जावरे, मनोज नामदेव जाधव, निलेश जाधव आणि विनोद ज्ञानदेव खांडेकर, निलेश कडू तळेले, राजेश प्रकाश जावळे, शेख बिस्मिल्ला शेख, सांडू विठ्ठल कडू तळेले अशा आठ जणांविरुद्ध कारवाई करत त्यांना अटक करण्यात आलेली आहे.