जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । जळगाव शहरातील सुप्रिम कॉलनी येथील विवाहितेने माहेरुन चांगल्या साड्या आणाव्यात, सोने आणि पैसे आणावे अशी मागणी करत ते आणले नाही म्हणून विवाहितेचा छळ करणाऱ्या पतीसह सासरच्या चार जणांविरोधात शुक्रवार, ३ मार्च रोजी दुपारी साडेचार वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
जळगावातील सुप्रिम कॉलनी येथील मनिषा सागर गोसावी वय २२ याा विवाह मुंबईतील मिराभाईंदर येथील सागर गणेश गोसावी यांच्याशी झाला आहे. लग्नानंतर काही दिवस गेल्यानंतर मनिषा हिने नोकरी करावी, तसेच माहेरुन चांगल्या साड्या आणाव्यात, सोने आणावेत, पैसे आणावेत अशी मागणी मनिषा तिचे पती सागर यांच्यासह सासरच्या मंडळींनी केली. या सर्व गोष्टींना मनिषा हिने नकार दिला असता, पतीसह सासरच्यांनी मनिषा हिला शिवीगाळ करत वेळावेळी टोचून बोलून शारिरीक व मानसिक छळ केला, या छळाला कंटाळून मनिषा ह्या माहेरी जळगावात निघून आल्या. व त्यांनी शुक्रवारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरुन मनिषा हिचे पती सागर गोसावी, सासू रेखाबाई गोसावी, सासरे गणेश मोतीराम गोसावी व नणंद माधुरी गणेश गोसावी सर्व रा. मीराभाईंदर, पूर्व ठाणे, मुंबई या चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महेंद्रसिंग पाटील हे करीत आहेत.