Home क्राईम जळगाव शहरातील चार गुन्हेगार एक वर्षासाठी हद्दपार

जळगाव शहरातील चार गुन्हेगार एक वर्षासाठी हद्दपार

0
44
crime-2


जळगाव प्रतिनिधी | जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दतील चार गुन्हेगारांना जिल्हाबंदी म्हणून हद्दपारचे आदेश पारीत केले आहे.

रविवारी १४ गुन्हेगारांच्या टोळीला हद्दपारीचे आदेश काढले होते. त्यानंतर सोमवारी रात्री उशीरा एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सनी उर्फ फौजी बाळकृष्ण जाधव (रा. रामेश्वर कॉलनी), पवन उर्फ घातक मुकुंदा सोनवणे (रा. रामेश्वर कॉलनी), मोनुसिंग जगदीशसिंग बावरी (रा. शिकलकर वाडा, तांबापुरा) व गुरुजितसिंग सुजानसिंग बावरी (रा. तांबापुरा) यांच्या विरोधात हद्दपारीची कारवाई केली आहे. या चौघांना महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम ५५ प्रमाणे जळगाव जिल्ह्यातून १ वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे. या आरोपींविरुद्ध अनेक गंभीर गुन्हे असून ते टोळीने गुन्हे करतात. सनी, पवन व मोनुसिंग या तिघांना नोटीस बजावण्यात आलेली असून गुरुजितसिंग हा कारागृहात बंदिस्त आहे.


Protected Content

Play sound