पैसे पडल्याचे भासवून लाखाची रोकड धुमस्टाईल लांबविली

सावदा – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाठीमागे पैसे पडल्याचे भासवून दोन अज्ञातांनी धुमस्टाईल १ लाखाची रोकड लांबविल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी सावदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

सविस्तर माहिती अशी की, रमेश यादव महाजन (वय-४०) रा. गोरडखेडा ता. रावेर हे शेती करून आपला उदरनिर्वाह करतात. कामाच्या निमित्ताने ते सोमवार २ मे रोजी सावदा येथील पंजाब नॅशनल बँकेजवळ त्यांच्या दुचाकीजवळ उभे होते. त्यावेळी अज्ञात दोन जण त्यांच्या दुचाकीवर आले व त्यांच्या दुचाकीजवळ पैसे टाकून म्हणाले की, पैसे पडले आहे. असं सांगितले असता त्यांच्या हातातील १ लाख रूपयांची रोकड असलेली पिशवी हिसकावून धुमस्टाईल लांबविली. त्यांनी आरडाओरड केली परंतू तोपर्यंत चोरटे पसार झाले होते. रमेश महाजन यांनी तातडीने सावदा पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारी वरून अज्ञात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार अन्वर तडवी करीत आहे.

Protected Content