Home क्राईम पैसे दुप्पट करण्याचा नाद नडला; तरूणाची ३१ लाखात फसवणूक

पैसे दुप्पट करण्याचा नाद नडला; तरूणाची ३१ लाखात फसवणूक

0
77

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील सदोबा नगरात राहणाऱ्या एका तरुणाला पैसे डबल करून देण्याच्या नावाखाली तब्बल ३१ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या संदर्भात गुरुवार १५ डिसेंबर रोजी मध्यरात्री जिल्हापेठ पोलीस ठाण्यात औरंगाबाद येथील सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, महेश तुकाराम भोळे (वय-३५, रा. आसोदा ता. जि. जळगाव हल्ली मुक्काम सदोबा नगर जळगाव) हा तरुण आपला परिवारासह वास्तव्याला आहे. खाजगी नोकरी करून आपला उदरनिर्वाह करतो. दरम्यान फेब्रुवारी २०२२ मध्ये त्याची ओळख औरंगाबाद येथील अरुण नागोराव अंभोरे यांच्याशी झाली. अंभोरे यांनी औरंगाबाद एमआयडीसीतील शेंद्रा येथे इंडोपर्ल नावाचे शिंपल्यापासून मोती तयार करण्याची शेती नावाची कंपनी स्थापन केली. त्यामध्ये त्यांची पत्नी मुलगी तसेच इतर तीन जणांना संचालक म्हणून काम पाहत आहे. दरम्यान महेश भोळे यांच्याशी वेळोवेळीसंपर्क करून १३ महिन्यात पैसे डबल होती असे सांगून महेश भोळे यांच्याकडून वेळोवेळी एकूण ३१ लाख ५० हजार रुपये घेतले. त्याच्या बदल्यात अंभोरे यांनी दोन कोरे चेक देऊन फसवणूक केली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर महेश भोळे यांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुरुवारी १५ डिसेंबर रोजी मध्यरात्री संशयित आरोपी अरुण नागोराव अंभोरे त्यांची पत्नी मंदा अरुण अंभोरे, मुलगी दिलीप अरुण अंभोरे, राहुल शेळके, विनोद बाहेकर आणि आकाश आठल्ये सर्व रा. शेंद्रा एमआयडीसी औरंगाबाद यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार करीत आहे.


Protected Content

Play sound