यावल प्रतिनिधी । यावल-भुसावळ रोडवरील पेट्रोल पंपावर दरोड्याच्या तयारीत असणार्या सहा जणांना पोलीसांनी पहाटे अटक केली आहे.
यावल पासून अंदाजे तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या यावल भुसावळ रोडवर पाटाच्या चारी जवळील पेट्रोल पंपावर दरोडा टाकून लुटण्याच्या उद्देशाने तयारी करून हातात शस्त्र घेऊन आढळून आलेल्या एकूण सहा आरोपींना यावल पोलिसांनी आज पहाटे पावणे तीन वाजता रंगेहात पकडले. वरील सर्व सहा आरोपी तालुक्यातील अकलुद येथील आहेत.
अंजाळे घाटात गेल्या पंधरा दिवसात रस्ता लुटीचे दोन दोन प्रकरणे झाली आहेत तक्रारीनुसार एक गुन्हा दाखल झाला असून त्यात सुद्धा काही आरोपी अटक झालेले आहेत. यामुळे पहाटे पावणेतीन वाजता यावल पोलीस निरीक्षक अरूण धनवटे पोलीस हेडकॉन्स्टेबल संजय देवरे व त्यांचे सहकारी पोलीस यावल भुसावळ रोडवर गस्त घालीत असताना यावल भुसावल रोड वरील पाटाच्या चारी जवळील घोडे पिर बाबा दर्गा चे दरम्यान यावल शहरापासून अंदाजे तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या पेट्रोल पंपावर दरोडा टाकून लुटण्याच्या उद्देशाने तयारी करून सहा जण त्यांना आढळून आले. त्यांच्या हातात कुर्हाड, चाकू, सुरा, लाकडी दांडे, दोरी, मिरची पावडर इत्यादी साहित्य होते. पोलिसांनी तातडीने मनोज रमेश सपकाळे वय २०, गोलू उर्फ धम्मरत्न दिगंबर धुरंदर वय १८, विशाल भाऊलाल साळवे वय १९, गणेश उर्फ अजय जनार्दन सोनवणे वय १९, संदीप आत्माराम सपकाळे वय २१, शिव हरी बागडे वय १८ या सहा संशयितांना अटक केली आहे.
या सहा आरोपी विरुद्ध यावल पोलीस स्टेशनला भाग ५ गु. र. नं. ६६ / २०२० भा.द.वि. कलम ३९९ सह शस्त्र अधिनियम ४ / २५ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पी. एस. आय. सुनिता कोळपकर या करीत आहेत.
जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !
वेबसाईट : https://livetrends.news
फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01
ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News
युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH
इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/live_trends_news
व्हाटसअॅप क्रमांक : ९३७०४०३२००