जळगाव (प्रतिनिधी) केरळमध्ये पूर आला होता तेव्हा आम्ही मदतीला धावलो होतो पण आताचे मुख्यमंत्री घरात बसूनच आहेत. जनतेचे प्रश्न सोडवण्याऐवजी नागरिकांनी मास्क लावा, पाणी उकळून प्या असे सल्ले घरी बसून मुख्यमंत्र्यांसह मंत्री देत आहेत,अशी टीका राज्याचे माजी मंत्री गिरीश महाजन यांनी केली आहे.
गिरीश महाजन यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले की आहे की, शासनातर्फे मंत्री म्हणून आम्ही लोकांना कठीण काळात धीर दिला, परंतु आज कोरोना रोगाची गंभीर परिस्थिती असतांना मुख्यमंत्री घरी बसून आहेत, तर मंत्री काय करताऐत हेच कळत नाही, दुसरीकडे जनता मात्र थेट मरणाच्या दारात आहे. मुख्यमंत्र्यापासून तर सर्व मंत्री घाबरलेले असून ते जनतेला काय धीर देणार आणि यातून कसे बाहेर काढणार हाच गंभीर प्रश्न आहे, अशी टीका राज्याचे माजी मंत्री गिरीश महाजन यांनी केली आहे. राज्यातील जनता कोरोनामुळे हवालदील झाली असताना मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्री घाबरलेले आहेत. हे मंत्री जनतेला काय धीर देणार ? असा प्रश्न महाजनांनी उपस्थित केला. मंत्री काय करतायत हे कळायला मार्ग नसल्याचेही महाजन म्हटले. जनतेचे प्रश्न सोडवण्याऐवजी नागरिकांनी मास्क लावा, पाणी उकळून प्या असे सल्ले घरी बसून मुख्यमंत्र्यांसह मंत्री देत असल्याची टीका महाजन यांनी केली आहे.