जळगाव, प्रतिनिधी । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कुठलेही नवीन टेंडर काढू नये, वर्क ऑर्डर देऊ नये तसेच एखाद्या कामाची वर्क ऑर्डर दिलेली असल्यास न काम सुरु न झालेली असल्यास अशा कामांच्या वर्क ऑर्डर सुध्दा रद्द करण्याचे सख्त आदेश असतांना आमदार राजूमामा भोळे, मनपा प्रशासन व ठेकेदाराने पूर्वीपासून तयार असलेल्या पुलासाठी निविदा काढून आमदार निधी हडपल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस अर्बन सेल जिल्हाध्यक्ष अश्विनी देशमुख व समन्वयक मुविकोराज कोल्हे यांनी केला आहे.
मुख्यमंत्री व उपमुख्यामंत्र्यांनी कुठलेही नवीन टेंडर काढू नये, वर्क ऑर्डर देऊ नये तसेच एखाद्या कामाची वर्क ऑर्डर दिलेली असल्यास न काम सुरु न झालेली असल्यास अशा कामांच्या वर्क ऑर्डर सुध्दा रद्द करण्याचे यांचे आदेश असतांना प्रभाग क्र.१७ मधील श्रीरामनगर व लक्ष्मीनारायण नगर येथील नाल्यावर पूर्वीपासून तयार असलेल्या पुलाचे २० लाख रुपयांचे टेंडर काढून शासनाचे हे २० लाख राजसोसपणे घशात घातले असल्याचा आरोप अश्विनी देशमुख यांनी केला आहे. देशमुख यांनी पुलाचे जीपीएस फोटो सहीत दि.२१ मार्च रोजी मेलव्दारे म.न.पा.संकेत स्थळावर मेल द्वारे हा पुल पुर्वीपासून तयार असल्याची पुराव्यासहीत तक्रार केलेली होती. या तक्रारीची म.न.पा. ने कुठलीही दखल न घेता कार्यादेश दिले. हे राक्षसी प्रवृत्तीने एकत्र झालेले अमर, अकबर, एन्थोनी जळगावकरांसाठी घातक ठरताह हे दिघेही आपआपल्या भुमीका विसरुन एकत्र एका ताटात येवून चाटून पुसून खातय. खाऊन झाल्यावर ताटही मोडून खाण्याची यांची मानसिकता झाली असल्याचा आरोप देशमुख यांनी केला आहे.
लिंक
https://www.facebook.com/508992935887325/videos/261052435183751/