पूरग्रस्तांसाठी एकवटले जारगाव : तरुणांनी काढली मदत फेरी (व्हिडिओ)

पाचोरा, नंदू शेलकर ।  पाचोरा तालुक्यातील जारगातील तरुणांनी  पूरग्रस्तांच्या सहाय्यासाठी एकत्र  येत मदत फेरी काढली असता गावातील प्रत्येकाने खारीचा वाटा उचलत त्यांना सहकार्य केले. 

जारगाव येथुन पूरग्रस्तांच्या मदतीसाठी  गावातील  व्हाॅलीबाॅल टीममधील मुलांनी साद दिल्यावर हजारो हात पुढे आलेत.   हलाखीची परिस्थिती असतांना देखील शेतकऱ्यांनी सुद्धा मदत देण्यासाठी पुढाकार घेतला आहे.  सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात महापुराने थैमान घातला. दोन जिल्ह्यातील शेकडो गावे पाण्यात बुडाली.गरीब असो की श्रीमंत संकटाचा सामना करत आहे.  पुरग्रस्तांची परिस्थिती आणि त्याची अवस्था बघून उभा महाराष्ट्र सुन्न झाला आहे. या पुरग्रस्तांच्या मदतीसाठी संपूर्ण महाराष्ट्र खंबीरपणे उभा राहिला. मात्र लक्ष वेधले ते पाचोरा तालुक्यातील जारगाव या खेडेगावातुन मदत फेरी काढुन प्रत्येक जण आपल्या ऐपतीप्रमाणे मदत करत आहे. यात  नविन भांडे, नविन कपडे यासोबतच जीवनावश्यक वस्तु देत आहे. छोटे, मोठे दुकानदार, व्यापारी जमेल ती मदत करत आहेत. अनेक जण या मदतीच्या यज्ञात भर टाकत आहेत. जमा करण्यात आलेले साहित्य येथील “आधारवड” या सामाजिक संस्थेकडे जमा करण्यात येत असून ते साहित्य आधारवडचे पदाधिकारी हे कोल्हापूर येथे रवाना करणार आहेत.

https://www.facebook.com/508992935887325/videos/198308435590496

 

Protected Content