पुलवामात चकमक ; एक दहशतवादी ठार, एक जवान शहीद

श्रीनगर (वृत्तसंस्था) जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथील गुसो येथे सुरक्षा दले आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत एक भारतीय जवान शहीद झाला आहे. तर एका दहशतवाद्याला ठार मारण्यात जवानांना यश आले आहे.

 

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील गुस्को भागात दहशतवादी आणि सुरक्षा दलांच्या दरम्यान एनकाउंटर सुरू आहे. सुरक्षा दलाने तीन दहशतवाद्यांना घेराव घातला असून बर्‍याच काळापासून गोळीबार सुरू आहे. गुसो सेक्टरमध्ये दहशतवादी अडकल्याची शक्यता आहे. आतापर्यंत या चकमकीत दोन जवान जखमी झाले आहेत. तर एका दहशतवाद्याला ठार मारण्यात जवानांना यश आले आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुरक्षा दलाला गुसो भागात दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाली होती. दहशतवादी घरात लपून मोठा कट रचण्याची योजना तयार करीत असल्याची माहिती मिळाली होती. स्वत: ला वेढलेले पाहून दहशतवाद्यांनी घराच्या आतून गोळीबार सुरू केला. दरम्यान, या पूर्वी ५ जुलै या दिवशी पुलवामामध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या पथकावर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता.

Protected Content