जळगाव प्रतिनिधी । रेशन दुकान नावावर करण्यासाठी ४० हजार रूपयांची लाच मागणाऱ्या पुरवठा विभागाच्या दोघा महिलांसह खासगी पंटरांचा आज जिल्हा न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.
रेशन दुकान आजोंबाच्या नावावरून वडिलांच्या नावावर करण्यासाठी ४० हजारांची लाच मागणार्या पुरवठा विभागातील अव्वल कारकून असलेल्या दोन महिलांसह मदत करणाऱ्या दोघा खाजगी पंटरांना ॲन्टी करप्शन विभागाने लाच घेताना जिल्हाधिकारी कार्यालयातील पुरवठा शाखेतच अटक केली होती.
जिल्हाधिकारी कार्यालयातील पुरवठा शाखेच्या अव्वल कारकून प्रमिला भानुदास नारखेडे (57, रा.मेथाजी प्लॉट, वसंत टॉकीजमागे, भुसावळ) व अव्वल कारकून पुनम अशोक खैरनार (37) तसेच खाजगी इसम व हमाल कंत्राटदार प्रकाश त्र्यंबक पाटील (55, जाकीर हुसेन कॉलनी, संभाजी नगर, जळगाव) दुध डेअरी चालक योगेश नंदलाल जाधव (33, रा.गुजराल पेट्रोल पंप, जैन मंदीराजवळ, जळगाव) यांना अटक करण्यात आली होती. आज बुधवारी आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांची जामीनावर सुटका करण्यात आली आहे.