Home आरोग्य पुन्हा तीन पॉझिटीव्ह; भुसावळ; पाचोरा, भडगावच्या रूग्णांचा समावेश

पुन्हा तीन पॉझिटीव्ह; भुसावळ; पाचोरा, भडगावच्या रूग्णांचा समावेश

0
28

जळगाव प्रतिनिधी । आज रात्री उशीरा आलेल्या रिपोर्टमध्ये तीन रूग्ण हे कोरोना पॉझिटीव्ह आले असल्याची माहिती प्रशासनाने जाहीर केली असून यात भुसावळ, पाचोरा व भडगाव तालुक्यातील निंभोरा येथील रूग्णांचा समावेश आहे.

संपूर्ण वृत्त सोबतच्या लिंकवर क्लिक करून वाचा

जिल्हा माहिती कार्यालयाने आज रात्री एका प्रेस नोटच्या माध्यमातून जिल्ह्यातील कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांबाबतची ताजी माहिती दिली आहे. यानुसार-जिल्ह्यातील जळगाव, अमळनेर, भडगाव, पाचोरा, भुसावळ येथील स्वॅब घेतलेल्या 64 कोरोना संशयित व्यक्तीचे नमुना तपासणी अहवाल आज नुकतेच प्राप्त झाले आहे. यापैकी 61 व्यक्तीचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर तीन व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहे.

पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तीमध्ये पाचोरा येथील एक 25 वर्षीय तरूण, भुसावळच्या तलाठी काॅलनीतील एक 18 वर्षीय तरूण तर निंभोरा, ता. भडगाव येथील 28 वर्षीय पुरूषाचा समावेश आहे. जिल्ह्यात आजपर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या 193 इतकी झाली असून त्यापैकी पंचवीस रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तर एकोणतीस रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.


Protected Content

Play sound