पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास काही समाज कंटकांनी जळगावातील येथील समता नगर भागातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना केल्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन महिला आघाडीतर्फे २५ जुन रोजी पोलिस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले.
सदर प्रकारातील दोषींना तात्काळ अटक करुन त्यांच्यावर देशद्रोहाचा व ॲट्रासिटीचा गुन्हा दाखल करुन जलद न्यायालयात खटला चालवून कठोर शिक्षा देण्यात यावी. मागणी मान्य न झाल्यास वंचित बहुजन आघाडीतर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल अशा मागणीचे निवेदन पोलिस निरीक्षक यांना देण्यात आले आहे.
निवेदन देते प्रसंगी वंचित बहुजन महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा संगिता साळुंखे, जिल्हा सचिव लता सपकाळे, तालुका सचिव सुनिल कदम, वंचित बहुजन आघाडीचे मा. तालुका अध्यक्ष अनिल लोंढे, समता सैनिक दलाचे किशोर डोंगरे, मेजर संतोष कदम, आधार सोनवणे, मा. नगरसेवक अशोक मोरे, राजेश सोनवणे, किरण निकम, शांताराम खैरे, दिलीप बागुल, धर्मा खेडकर, खंडु सोनवणे, भास्कर सोनवणे, रामदास गायकवाड, प्रशिक सपकाळे उपस्थित होते. सदरचे निवेदन पाचोरा पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक राहुल मोरे यांनी स्विकारले.