पुण्यात पुन्हा लॉकडाऊनची घोषणा !

 

पुणे (वृत्तसंस्था) कोरोनाचा संसर्ग वाढतच असल्यामुळे पुणे जिल्ह्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुण्याचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तसे आदेश दिले आहेत. त्यानुसार १३ जुलैपासून १५ दिवस पुणे बंद राहणार आहे. दरम्यान, गुरुवार ९ जुलै रोजी पुणे शहरात तब्बल १ हजार ५७३ कोरोनाबाधितांची नोंद झाली. तर ३३ रुग्णांचा मृत्यू झाला होता.

 

 

पुणे जिल्ह्यातही रुग्ण वाढीचं प्रमाण मोठं आहे. नागरिकांची बेफिकीरी देखील यास कारणीभूत ठरली आहे. नागरिकांनी शिस्त न पाळल्यास पुन्हा लॉकडाऊन घेण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी याआधी वेळोवेळी दिला होता. त्यानंतरही लोकांचे विनाकारण फिरणे थांबले नाही. त्यातून संसर्गाचा धोका वाढला. तो आणखी वाढू नये म्हणून अखेर सोमवारी मध्यरात्रीपासून पुन्हा लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तसे आदेश दिले होते.

Protected Content