पुण्यात करोनाग्रस्त रूग्णांची संख्या १८ वर !

पुणे (वृत्तसंस्था) काही दिवसांपूर्वीच परदेश दौऱ्यावरून पुण्यात परतलेल्या एका महिलेला करोनाची लागण झाली असल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर आता पुण्यात करोनाग्रस्त रूग्णांची संख्या १८ वर पोहोचली आहे.

 

नेदरलॅंड आणि फ्रान्सहून प्रवास करून आलेली पुण्यातील महिला कोरोना पॉझिटिव्ह ठरली आहे. त्यामुळे पुण्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 18 गेली आहे. ही महिला 15 मार्चला पुण्यात पोहचली आणि 17 मार्चला तपासणी झाली असता तीला नायडू हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं. काल रात्री उशीरा तिचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. दरम्यान, भारतातील रुग्णांची संख्या 147 पर्यंत पोहोचली आहे. तर आतापर्यंत देशभरात तीन जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.

Protected Content