पुण्यातील भाजप नगरसेवकांमध्ये उद्रेक; राष्ट्रवादीत प्रवेशाची चर्चा

 

पुणे प्रतिनिधी । येथील भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांमध्ये अस्वस्थता असून १९ नगरसेवक लवकरच राष्ट्रवादीत प्रवेश करण्याच्या तयारी असल्याची माहिती समोर आली आहे. तर भाजप नेत्यांनी मात्र या वावड्या असल्याचे स्पष्ट केले आहे.

मतदारसंघासाठी निधी उपलब्ध होत नसल्याची तक्रार भाजप नगरसेवकांनी शहराध्यक्षांना केली होती. पण याबाबत टाळाटळ करत निवडक लोकांनाच विचारपूस होत असल्याने भाजपचे नगरसेवक नाराज असल्याचं कळतं. त्यामुळे हे १९ नाराज नगरसेवक महाविकास आघाडीमध्ये सामील होणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे.

मात्र या चर्चेचा भाजप खासदार गिरीश बापट यांनी इन्कार केला आहे. भाजपचा एकही नगरसेवक पक्ष सोडणार नाही, असा दावा गिरीश बापट यांनी केला. इतकंच नाही तर भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनीही या चर्चेचं खंडण केलं आहे.

Protected Content