Home आरोग्य पुण्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या १४९१ वर पोहचली !

पुण्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या १४९१ वर पोहचली !


पुणे (वृत्तसंस्था) पुणे जिल्ह्यातील एकूण कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या १४९१ वर येऊन पोहचली आहे. दरम्यान, जिल्ह्यात आतापर्यंत ८३ कोरोनाग्रस्त रुग्णांना प्राण गमवावे लागले आहेत.

 

पुणे जिल्ह्यात एका दिवसातील सर्वाधिक म्हणजे १४३ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे पुण्यात कोरोना रुग्ण दुप्पट होण्याचे वेग नऊ दिवसांवर गेला आहे. पुणे जिल्ह्यात मंगळवारी तीन कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू झाला. पुणे जिल्ह्यात मंगळवारी २० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत २३० जण डिस्चार्ज मिळाल्याने घरी गेले आहेत. पुण्यात कोरोना रुग्णांचा दुप्पट होण्याचा वेग सातवरुन तर नऊ दिवसांवर गेला आहे. पुणे शहरात २८ एप्रिलपर्यंत १३५२ कोरोनाग्रस्त रुग्ण आढळल्याची नोंद महापालिकेकडे आहे. दरम्यान, भवानी पेठेतील रुग्णसंख्या २६३ वर गेली आहे.


Protected Content

Play sound