पुणे (वृत्तसंस्था) पुणे-माणगाव महामार्गावर ताम्हिणी घाटात मध्यरात्री एका कारला झालेल्या भीषण अपघातात तीन जण जागीच ठार झाले, तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. निखिल गुळे, चंद्रकांत निकम, विक्रम सिंग अशी मृतांची नावं आहेत.
पुण्याहून दिवे आगारच्या दिशेने जात असताना मध्यरात्री दोन वाजेण्याच्या सुमारास हा अपघात झाला. ताम्हिणी घाटात कोंडेसर गावाजवळ असताना चालकाला डुलकी लागल्याने त्याचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार रस्त्यालगतच्या झाडावर जाऊन आदळली. निखिल गुळे, चंद्रकांत निकम, विक्रम सिंग अशी मृतांची नावं आहेत. जखमींमध्ये विजय पाटील, सुनील टेलंगे यांचा समावेश असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.