पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती कार्यक्रम

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | मंगळवार ३१ मे रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २९७ व्या जयंती कार्यक्रम दरवर्षांप्रमाणे उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.

 

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त मंगळवार दि. ३१ मे रोजी सकाळी ८.३० वाजता जुना हायवे चंदुआण्णा नगर चौक गट नं.२५ येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ओपन स्पेस सभामंडपाच्या बांधकामाचे भूमिपूजन आमदार राजुमामा भोळे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. तरी समाज बंधु-भगिनींनी मोठ्या संख्येने कार्यक्रम स्थळी वेळेवर उपस्थित राहण्याचे आवाहन मल्हारसेनेचे माजी सरसेनापती सुभाष सोनवणे , धनगर समाज महासंघाचे जिल्हाध्यक्ष दिलिप धनगर , कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गणेश बागुल सर , प्रभाकर न्हाळदे , अरुण ठाकरे , रामचंद्र चर्‍हाटे , धर्मा सोनवणे , सुभाष करे , गजानन निळे , प्रविण पवार , संतोष कचरे , यशवंत शिरोळे , तुळशिराम सोनवणे , डाॅ.संजय पाटील , महेंद्र सोनवणे यांनी केले आहे.

Protected Content