Home क्रीडा पी. व्ही. सिंधूची सेमीफायनलमध्ये धडक

पी. व्ही. सिंधूची सेमीफायनलमध्ये धडक

0
32

 

टोकियो : वृत्तसंस्था । भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने टोक्यो ऑलिम्पिकमध्ये उपांत्य फेरीत धडक दिली आहे. तिने उपांत्यपूर्व फेरीत जपानच्या अकाने यामागुचीवर सहज सरशी साधली.

 

सिंधूच्या नव्या शैलीसमोर  यामागुची निष्प्रभ ठरली. तिने यामागुचीचा २१-१२, २२-२० असे सरळ सेटमध्ये नमवले.

 

सिंधू आता सुवर्णपदकापासून फक्त दोन पाऊल दूर आहे. उपांत्यफेरीच्या लढतीत सिंधूसमोर ताई जू यिंग किंवा रत्नाचोक इंतानोन यापैकी एकजण आमनेसामने असेल. या स्पर्धेचा चौथा उपांत्यपूर्व सामना तैवानच्या ताई जू आणि थायलंडच्या इंतानोन यांच्यात होणार आहे. हा सामना जिंकणारी खेळाडूच पी. व्ही. सिंधूला टक्कर देईल.

 

महिला एकेरीच्या दुसऱ्या उपांत्य फेरीत दोन चीनी खेळाडू चेन युफेई आणि ही बिंगझाओ यांच्यात सामना होईल. ही बिंगजाओने जपानच्या नोझोमी ओकुहाराला पराभूत करून उपांत्य फेरी गाठली. चेन युफेईने कोरियाच्या एन से यंगचा पराभव केला.

 


Protected Content

Play sound