जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । के. सी. ई च्या पी. जी. महाविद्यालयात विद्यार्थी प्रशिक्षण कार्यशाळा नुकतीच पार पडली.
प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचे प्रभारी संचालक डॉ.दीपक दलाल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. व्ही. एस . झोपे, आयक्युएसई समन्वयक प्रा. संदीप पाटील व रसायनशास्त्र विभागाचे डॉ.आर. एम. पाटील हे उपस्थितीत होते. कार्यशाळेचे आयोजन अंतर्गत गुणवत्ता हमी सेल द्वारे करण्यात आले होते. डॉ. दीपक दलाल यांनी महाविद्यालयीन बदलत्या परीक्षा व मूल्यमापन पद्धती या विषयावर विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले.
प्रा. संदीप पाटील यांनी संस्थेची व महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या सुविधा व विविध शाखांची ओळख करून दिली. डॉक्टर आर एम पाटील यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली. एक दिवसांच्या प्रशिक्षण कार्यक्रमात वक्त्यांसोबत संवादात्मक सत्रांचा समावेश करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. रूपाली चौधरी यांनी केले. महाविद्यालयाच्या सर्व नव्याने प्रवेशित झालेल्या विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेतला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.