जळगाव : प्रतिनिधी । मूळ शेतमालकाला काहीही माहिती नसताना दुसऱ्यानेच पीकविमा उतरवला मात्र आता नेमकी माहिती शेतमालकाला कुणीच देत नसल्याचा प्रकार समोर आला आहे
अमळनेर तालुक्यातील निंभोरा येथील जगदीश पाटील यांची निंभोरा शिवारात ९५ आर शेती आहे त्यांनी पीक कर्जही घेतले आहे त्यांनी विकासो सचिवांकडे चौकशी केल्यावर त्यांच्या या शेतावर आधीच कुणीतरी विमा उतरलेला असल्याचे सांगण्यात आले . ९५ पैकी ९४ आर शेताचा पीकविमा उतरवला आहे . त्यासाठी मूळ मालकाचे आधारकार्ड आणि बँक तपशील पण वापरला गेल्याचे विमा कंपनीच्या पोर्टलवर दिसते आहे हा नेमका गोंधळ कसा झाला ? याबद्दल माहिती डब्यास किंवा जबादारी घेण्यास कुणीच तयार नसल्याने जगदीश पाटील मेटाकुटीला आले आहेत
जगदीश पाटील यांनी विकासो , जिल्हा बँक आणि विमा कंपनीकडूनही माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला पण त्यांना कुणीच दाद देत नाही अशी त्यांची व्यथा आहे पुढे विमा नुकसान भरपाई मंजूर झाल्यावर ती अशी परस्पर कुणी कडून घेतली तर त्याची जबाबदारी कोण घेणार ? असा त्यांचा सवाल आहे . आज त्यांनी या गोंधळाची चौकशी करावी म्हणून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे .
https://www.facebook.com/508992935887325/videos/556004428917757