जळगाव प्रतिनिधी । कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पीएच.डी. करणाऱ्या विद्यार्थ्यांची अंतिम मौखिक परिक्षा ऑनलाईन पद्धतीने याव्यात अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने कुलगूरू यांना निवेदनाद्वारे केली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोरोना विषाणूचा फैलाव दिवसेंदिवस वाढत आहे. या महामारीच्या संकटात पीएच.डी. विद्यार्थ्यांची अंतिम मौखिक परिक्षा ही ऑनलाईन पध्दतीने इतर विद्यापिठात घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचप्रध्दतीने कवयित्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातही अशाच पध्दतीने पीएच.डी.च्या विद्यार्थ्यांची परिक्षा ऑनलाईन पध्दतीने घेण्यात यावी. तसेच २०१९ मधील पेटची परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना गाईड अजून उपलब्ध का होत नाही. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने निवेदन देण्यात आले होते. विद्यार्थ्यांना त्वरित गाईड उपलब्ध करून द्यावेत जेणेकरून विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही.
निवेदनावर यांची स्वाक्षरी
निवेदनावर राष्ट्रवादी काँग्रेस महानगर सचिव ॲड. कुणाल पवार, फार्मर्सी स्टूडेंट कॉन्सिल राज्याध्यक्ष भूषण भदाने, राष्ट्रवादी युवती काँग्रेसचे जिल्हाध्यक्षा कल्पिता पाटील, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच जिल्हाध्यक्ष रोहन सोनवणे, गणेश निंबाळकर, गौरव वाणी, अक्षय वंजारी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.