पारोळा (प्रतिनिधी) तालुक्यात दहा वर्षे सेवा बजावलेल्या तथा सध्या अमळनेर तालुक्यातील कावपिंप्री येथील जि.प. प्राथमिक शाळेत कार्यरत असलेल्या उपशिक्षिका सुरेखा शिवाजी बोरसे यांनी शिक्षणशास्त्र या विषयात पीएचडी मिळवली आहे. यानिमित्ताने त्यांचा नुकताच सत्कार करण्यात आला.
सुरेखा बोरसे या शिक्षण विभागात एक आदर्श व उपक्रमशील शिक्षिका म्हणून सुपरिचित आहेत. त्यांनी हे यश कठोर परिश्रम व मेहनत घेऊन प्राप्त केले आहे. अध्यापना बरोबर ‘प्राथमिक शिक्षकांच्या नैतिक मूल्यांचा विद्यार्थ्यांच्या वर्तनावर होणारा परिणाम अभ्यासणे’ या विषयाचा सखोल अभ्यास करून आपले संशोधन कार्य त्यांनी पूर्ण केले. सदरची पदवी मुंबई विद्यापीठातून प्रा.डॉ. माधवराव गवई यांच्या मार्गदर्शनाने त्यांनी प्राप्त केली आहे. त्यांचे हे कार्य इतर शिक्षकांसाठी प्रेरणादायी ठरेल. पीएचडी पदवी मिळाल्याबद्दल डॉक्टर सुरेखा बोरसे यांच्यासह त्यांचे पती शिक्षक राजेंद्र भास्करराव पाटील यांचाही सत्कार पारोळा येथील सेवानिवृत्त शिक्षण विस्ताराधिकारी व ग.स.सोसायटी जळगावचे माजी चेअरमन जे.के.पाटील यांनी सहकुटुंब केला. डॉ. सुरेखा बोरसे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.