Home क्राईम पिलखेडा येथे शेतमजूराची विष घेवून आत्महत्या

पिलखेडा येथे शेतमजूराची विष घेवून आत्महत्या


जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील पिलखेडा येथे राहणाऱ्या ४५ वर्षीय व्यक्तीने विष प्राषण करुन आत्महत्या केली. मंगळवारी रात्री ही घटना घडली आहे. या घटनेमागील कारण अद्याप अस्पष्ट आहे.

पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, चिंतामण सोना मोरे (वय ४५, रा.पिलखेडा ता.जि.जळगाव) असे मृत प्रौढाचे नाव आहे. मोरे हे शेतमजुरी करुन कुटंुबाचा उदरनिर्वाह करीत होते. मंगळवारी रात्री त्यानी विष प्राषण केेल्याने त्यांचा मृत्यू झाला. कुटुंबियांनी त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले होते. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करुन त्यांना मृत घोषित केले. बुधवारी शवविच्छेदन करुन मृतदेह कुटंुबियांच्या ताब्यात देण्यात आला. मोरे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिस नाईक विजय दुसाने तपास करीत आहेत.


Protected Content

Play sound