पियुष गोयल यांच्याकडे अर्थ खात्याचा अतिरिक्त कार्यभार

नवी दिल्ली वृत्तसंस्था । रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्याकडे अर्थ खात्याचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला असून ते आगामी अर्थसंकल्प सादर करण्याची शक्यता आहे.

केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांच्या मांडीला गाठ झाल्यामुळे ते उपचारासाठी अमेरिकेला गेले आहेत. यामुळे त्यांच्या अनुपस्थितीत अर्थ खात्याचा अतिरिक्त प्रभार रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याकडे देण्यात आलेला आहे. यंदा १ फेब्रुवारी रोजी अंतरीम अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे. गोयल हेच हा अर्थसंकल्प सादर करतील हे आता स्पष्ट झाले आहे.

Add Comment

Protected Content