भोपाळ वृत्तसंस्था । एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्यानंतर तिच्या घरच्यांनी पिडीता आणि बलात्कारी यांना सोबत बांधून गावातून धिंड काढल्याचा धक्कादायक प्रकार मध्यप्रदेशात उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.
याबाबत वृत्त असे की, मध्य प्रदेशातील अलिराजपूर जिल्ह्यातील गावात रविवारी एका १६ वर्षीय मुलीवर २१ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आणि पीडितेच्या कुटूंबाने पिडीता आणि आरोपी दोघांनाही दोरीने बांधले आणि नंतर त्यांना गावात मारहाण करुन मिरवणूक काढून त्याचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर टाकला.
या प्रकरणात पीडितेच्या तक्रारीवरून दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याप्रकरणी बलात्काराच्या आरोपीविरोधात पहिला गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर दुसरा गुन्हा पीडितचे कुटूंब आणि नातेवाईकांविरूद्ध दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात उपविभागीय अधिकारी पोलिस (एसडीओपी) दिलीपसिंग बिल्वाल यांनी सांगितले की जोबट पोलीस स्टेशन परिसरातील एका गावात अल्पवयीन बलात्कार पीडित मुलीने रविवारी पोलिस ठाण्यात दोन एफआयआर दाखल केले आहेत. पहिली एफआयआर उदयगड पोलिस ठाण्याच्या झिरी गावातील २१ वर्षीय व्यक्तीवर झालेल्या बलात्काराच्या संदर्भात लिहिलेली आहे आणि दुसरी एफआयआर पीडित आणि आरोपीशी दोरीने बांधून त्यांची धिंड काढल्याबाबतची आहे.
ते म्हणाले की, पीडित मुलीच्या पहिल्या तक्रारीवरून पोलिसांनी बलात्कार करणार्याच्या विरुद्ध आयपीसी कलम ६ ३७६ तसेच पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आणि त्याला अटक केली. त्याच वेळी पीडितेच्या दुसर्या तक्रारीवरून पोलिसांनी धिंड काढणारे पीडितेचे नातेवाईक आणि नातेवाईकांविरूद्ध कलम २ ४,, ६०६, ५ ३५५, ३२३, २ ३४२ आणि १७७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. यातील पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे.